भजनी मालिका
← भजनांकडे परत

गजाचें भार वोझें । गाढवा तें न साजे

gajachen bhar vojhen | gadhava ten na saje

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गजाचें भार वोझें । गाढवा तें न साजे ॥१॥ तैसे भक्त अभक्त दोन्ही । वेगळीक वेगळेपणीं ॥२॥ मेघ वरुषे निर्मळ जळ । परी जैसे बीज तैसें फळ ॥३॥ एका जनार्दनीं गुण । चंदन वेळू नोहे समान ॥४॥