भजनी मालिका
← भजनांकडे परत

गडियां म्हणे पळतां घरें

gadiyan mhane palatan gharen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
गडियां म्हणे पळतां घरें । नवनितें क्षीरें असती ते ॥१॥ म्हणती गोवळ ऐके कान्हा । आहेसि तूं देखणा पुढें होई ॥२॥ आम्ही नेणो थारेमारे । अवघीं घरें तुज ठावीं ॥३॥ निळा म्हणे काढीं माग । आम्ही सवेग येऊं मागें ॥४॥