भजनी मालिका
← भजनांकडे परत

गंगा पवित्र सर्वागुणी । स्पर्शे विटाळे रांजणीं

ganga pavitra sarvaguni | sparshe vitale ranjanin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
गंगा पवित्र सर्वागुणी । स्पर्शे विटाळे रांजणीं ॥१॥ तेविं चैतन्य अवघें एक । भूतभेदें त्या कळंक ॥२॥ भूमिका नाहीं खंडण केली । उत्तम अधम संगें झाली ॥३॥ निळा म्हणे धर्माधर्म । वर्णानुरुप क्रियाकर्म ॥४॥