भजनी मालिका
← भजनांकडे परत

गजेंद्र सावजे धरिला पानेडीं

gajendra savaje dharila panedin

रचनाकार: संत रामदास · अभंग
गजेंद्र सावजे धरिला पानेडीं। रामे तेथे उडी टाकली प्रल्हाद गांजिला तया कोण सोडी । रामे तेथे उडी टाकीयेली तेहेतीस कोटी देव पडिले बांदोडी । रामे तेथे उडी टाकियेली दासा पायी पडली देहबुध्दीबेडी। रामे तेथे उडी टाकियेली रामदास म्हणे कां करिसी वणवण। रामें भक्त कोण उपेक्षिले।