भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंत नाही तो अनंत । त्यासि दोरी करी भ्रांत

ant nahi to anant | tyasi dori kari bhrant

रचनाकार: संत रामदास · अभंग
अंत नाही तो अनंत । त्यासि दोरी करी भ्रांत ।। ऐसें जनाचें करणें । कैसा संसार तरणें ।। देव व्यापक सर्वांसी । त्यास म्हणती एकदेशी ।। रामदासी देव पूर्ण । त्यासी म्हणती अपूर्ण ।।