भजनी मालिका
← भजनांकडे परत

गंगोदक तें पवित्र । येर कडु अपवित्र

gangodak ten pavitra | yer kadu apavitra

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गंगोदक तें पवित्र । येर कडु अपवित्र ॥१॥ दोनीं उदकें तंव सारखीं । शुद्ध अशुद्ध काय पारखीं ॥२॥ गंगा देवापासून जाली । येर काय मध्यवर्ती केली ॥३॥ शुद्धाशुद्ध हे वासना । शरण एका जनार्दना ॥४॥