भजनी मालिका

भजने

गडी म्हणती सकळ । कृष्णा तुं घेई कवळ । हरी म्हणे उतावीळ । घ्यावा तुम्हीं ॥१॥ गडी नायकती सर्वथा । हरी म्हणे मी नेहे आतां । म्हणोनी रुदोनी तत्त्वतां । चालिला कृष्ण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गणपति पूजिली ते दोंदिल भले । वैष्णव न भले अरे मनी ॥१॥ सीतळा पूजिली ते ह्मइसे भले । वैष्णव न भले अरे मनी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गणिका अजामेळें काय साधन केलें । नामचि उच्चारिलें स्वभावतां ॥१॥ नवल हें पहा नवल हें पहा । अनुभवें अनुभवा देहामाजीं ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

गति अधोगति मनाची युक्ति । मन लावीं एकांतीं साधुसंगें ॥१॥ जतन करा जतन करा । धांवतें सैरा ओढाळ तें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

गंध आणि अक्षता पंचामृत उदक । धूप आणि दीप आणियेले ॥१॥ संत सज्जनांचा मिळाला समुदावो । मध्यें ज्ञानदेवो चालतसे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गंधर्वनगरीं क्षण एक राहावें । तें चि करावें मूळक्षेत्र ॥१॥ खपुष्पाची पूजा बांधोनि निर्गुणा । लक्ष्मीनारायणा तोषवावें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

गयाळाचें काम हिताचा आवारा । लाज फजितखोरा असत नाहीं ॥१॥ चित्ता न मिळे तें डोळां सलों येतें । असावें परतें जवळूनि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

गरुड हनुमंत मुक्ताई सोपान । देव साधुजन आनंदले ॥१॥ मागें पुढें संत पताकांचे भार । मध्यें ज्ञानेश्वर मिरवतो ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गरुडपाराजवळी नामदेव आला । सन्मुख देखिला पांडुरंग ॥१॥ मेघःशाममूर्ती डोळस सांवळी । तें ध्यान ह्रदयकमळीं धरोनि ठेला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव