भजनी मालिका
← भजनांकडे परत

गरुड हनुमंतादि आपण । सामोरा येत जगज्जीवन

garud hanumantadi apan | samora yet jagajjivan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गरुड हनुमंतादि आपण । सामोरा येत जगज्जीवन ॥१॥ आवडी कीर्तना ऐशी । लक्ष्मी तेथे प्रत्यक्ष दासी ॥२॥ मोक्षादिकां नव्हें वाड । येरा कोण वाहे काबाड ॥३॥ एका जनार्दनीं भुलला । उघडा कीर्तनी रंगला ॥४॥