भजनी मालिका
← भजनांकडे परत

गयाळाचें काम हिताचा आवारा । लाज फजितखोरा असत नाहीं

gayalachen kam hitacha avara | laj phajitakhora asat nahin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गयाळाचें काम हिताचा आवारा । लाज फजितखोरा असत नाहीं ॥१॥ चित्ता न मिळे तें डोळां सलों येतें । असावें परतें जवळूनि ॥ध्रु.॥ न करावा संग न बोलावी मात । सावधान चित्त नाहीं त्यासी ॥२॥ तुका म्हणे दुःख देतील माकडें । घालिती सांकडें उफराटें ॥३॥