भजनी मालिका
← भजनांकडे परत

गडी गेले रडी । कान्हो नेदीस तूं चढी

gadi gele radi | kanho nedis tun chadhi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गडी गेले रडी । कान्हो नेदीस तूं चढी ॥१॥ आम्ही न खेळों न खेळों । आला भाव तुझा कळों ॥ध्रु.॥ न साहावे भार । बहु लागतो उशीर ॥२॥ तुका आला रागें । येऊं नेदी मागें मागें ॥३॥