भजनी मालिका
← भजनांकडे परत

गंध आणि अक्षता पंचामृत उदक । धूप आणि दीप आणियेले

gandh ani akshata panchamrut udak | dhup ani dip aniyele

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गंध आणि अक्षता पंचामृत उदक । धूप आणि दीप आणियेले ॥१॥ संत सज्जनांचा मिळाला समुदावो । मध्यें ज्ञानदेवो चालतसे ॥२॥ क्षेत्र प्रदक्षणा करावया उद्देशी । मुहूर्त देवापाशीं विचारिला ॥३॥ दशमीचे दिवशीं रिघावें बाहेर । हरिदिनीं जागर निशिदिनीं ॥४॥ द्वादशी पारणें सोडावे निश्चळ । नेमियेलें स्थळ सिद्धेश्वरी ॥५॥ नामा म्हणे हरि नेमिला सिद्धांत । काय माझा अंत पाहातसां ॥६॥