भजनी मालिका
← भजनांकडे परत

गति अधोगति मनाची युक्ति । मन लावीं एकांतीं साधुसंगें

gati adhogati manachi yukti | man lavin ekantin sadhusangen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गति अधोगति मनाची युक्ति । मन लावीं एकांतीं साधुसंगें ॥१॥ जतन करा जतन करा । धांवतें सैरा ओढाळ तें ॥ध्रु.॥ मान अपमान मनाचें लक्षण । लाविलिया ध्यान तें चि करी ॥२॥ तुका म्हणे मन उतरी भवसिंधु । मन करी बंधु चौऱ्यांशीचा ॥३॥