भजनी मालिका
← भजनांकडे परत

क्षणक्षणा हाचि करावा विचार । तरावया पार भवसिंधु

kshanakshana hachi karava vichar | taravaya par bhavasindhu

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
क्षणक्षणा हाचि करावा विचार । तरावया पार भवसिंधु ॥१॥ नाशिवंत देह जाणार सकळ । आयुष्य खातो काळ सावधान ॥ध्रु.॥ संतासमागमीं धरूनि आवडी । करावी तांतडी परमार्थी ॥२॥ तुका म्हणे इहलोकींच्या वेव्हारें । नये डोळे धुरें भरूनि राहों ॥३॥