भजनी मालिका
← भजनांकडे परत

क्षीरसागरीचें निजरुपडें । पुंडलिकाचेनि पडिपाडें । उभें असे तें रोंकडें । पंढरीये गोजिरें

kshirasagarichen nijarupaden | pundalikacheni padipaden | ubhen ase ten ronkaden | pandhariye gojiren

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
क्षीरसागरीचें निजरुपडें । पुंडलिकाचेनि पडिपाडें । उभें असे तें रोंकडें । पंढरीये गोजिरें ॥१॥ पहा पहा डोळेभरी । शंख चक्र मिरवे करीं । कास कसिली पिंताबरीं । हृदयावरी वैजयंती ॥२॥ भीमरथी वाहे पुढां । करित पापाचा रगडा । पुंडलिकाचे भिडा । उभा उगा राहिला ॥३॥ शरण एका जनार्दनीं । त्रैलोक्याचा धनी । नाचतो कार्तनीं । भक्तांमागें सर्वदा ॥४॥