भजनी मालिका
← भजनांकडे परत

क्षणभरी आम्ही सोसिलें वाईट । साधिलें अवीट निजसुख

kshanabhari amhi sosilen vait | sadhilen avit nijasukh

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
क्षणभरी आम्ही सोसिलें वाईट । साधिलें अवीट निजसुख ॥१॥ सांडी मांडी मागें केल्या भरोवरी । अधिकचि परी दुःखाचिया ॥२॥ तुका म्हणे येणें जाणें नाहीं आतां । राहिलों अनंताचिये पायीं ॥३॥