भजनी मालिका

भजने

कोळशासी दूध मर्दोनियां धूतां । न पावे शुद्धता कांहीं केल्या ॥१॥ दुर्जनासी तैसा बोध परमार्थ । नवजायचि स्वार्थ कांहीं केल्या ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कौडीकौडीसाठी फोडिताती शिर । काढूनि रुधिर मलंग ते ॥१॥ पांघरती चर्म लोहाची सांकळी । मारिती आरोळी धैर्यबळें ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

कौतुकानें तेथें आले सावकाश । उभे हरिदास कीर्तनासी ॥१॥ दहा दिवस तेथें राहियेले स्वस्थ । अवघ्यांचा मनोरथ पूर्ण जाला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कौसल्या यज्ञशे सेउनी राम जन्मला तियेचें पोटीं । वनवासासी जातां वियोग पावली दुःख शोकें हिंपुटीं ॥१॥ धन्य धन्य ते अहिल्या शिळा । हरीच्या पावली चरणकमळा ॥धृ॥

रचनाकार: संत एकनाथ

कौस्तुभ सोज्वळ कंठीं शोभताहे । भक्तांसाठीं बाहे उभारिली ॥१॥ आन हितासाठीं करिसी धांवण्या । विदुराच्या कण्या गोड करी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

क्या कहुं नहीं बुझत लोका । लिजावे जम मारत धका ॥१॥ क्या जीवनेकी पकरी आस । हातों लिया नहिं तेरा घांस ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

क्या गाऊं कोई सुननवाला । देखें तों सब जग ही भुला ॥१॥ खेलों आपणे राम इसातें । जैसी वैसी करहों मात ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

क्या मेरे राम कवन सुख सारा । कहकर दे पुछूं दास तुह्मारा ॥ध्रु.॥ तनजोबनकी कोन बराई । ब्याधपीडादि स काटहि खाई ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

क्याला मज आयो वारितेसी घरा । खेळतों सोकरा नंदाचा मी ॥१॥ बहु दिसीं झाली यासीं मज भेटी । आतां वाटे तुटी न परावी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

क्रिया कर्म धर्म तिहीं केलें सांग । जिहीं पांडुरंग दाख-येला ॥१॥ ओळखोनि मनें धरिला मानसीं । उभा अहर्निशीं ह्लदय-कमळीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

क्रिया कर्म धर्म तूंचि होसी माझे । राखेन मी तुझें द्वार देवा ॥१॥ मज पाळीसी तैसा पाळीं दीनानाथा । न सोडीं सर्वथा नाम तुझें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

क्रीडा करी गोपाळपुरीं । आपण श्रीहरी गोवळांसवें ॥१॥ वेणुवादन सप्तस्वरें । वेधी जिव्हारें सकळांची ॥२॥

रचनाकार: संत निळोबा