भजनी मालिका
← भजनांकडे परत

क्रीडा करी गोपाळपुरीं । आपण श्रीहरी गोवळांसवें

krida kari gopalapurin | apan shrihari govalansaven

रचनाकार: संत निळोबा · अभंग
क्रीडा करी गोपाळपुरीं । आपण श्रीहरी गोवळांसवें ॥१॥ वेणुवादन सप्तस्वरें । वेधी जिव्हारें सकळांची ॥२॥ नृत्य करी नाना छंदें । नाचवी विनोदें संवगडियां ॥३॥ निळा म्हणे दधिओदन । काला कालावून जेवितु ॥४॥