भजनी मालिका
← भजनांकडे परत

कौलें भरियेली पोट । निग्रहाचे खोटे तंट

kaulen bhariyeli pot | nigrahache khote tant

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कौलें भरियेली पोट । निग्रहाचे खोटे तंट ॥१॥ ऐसें माता जाणे वर्म । बाळ वाढवितां धर्म ॥ध्रु.॥ कामवितां लोहो कसे। तांतडीनें काम नासे ॥२॥ तुका म्हणे खडे । देतां अक्षरें तें जोडे ॥३॥