भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोंवळें ठुसठुसित मोतियांचे घड

konvalen thusathusit motiyanche ghad

कोंवळें ठुसठुसित मोतियांचे घड । शृंगारिलें गूढ जया लेणीं ॥१॥ बैसोनियां रथीं सुरनर खेळती देखोनिया पशुपति वेडावले ॥ध्रु०॥ युक्ति खुंटली वासना निमाली । कळां पैं बैसली पद्मासनीं ॥२॥ होय कीं नव्हे ज्ञानदेव पुसती । आठवितां निवृत्ति भेटी होये ॥३॥