भजनी मालिका
← भजनांकडे परत

कौल जाला रघुनाथाचा

kaul jala raghunathacha

रचनाकार: संत रामदास · अभंग
कौल जाला रघुनाथाचा । मेळा मिळाला संतांचा अहंभाव वरपेकरी । बळे घातला बाहेरी क्षेत्रीं मंत्री विवेक जाला। क्रोध देशोधडी केला काम देहींच कोंडिला। लोभ दंभ नागविला फितवेकर होता भेद । त्याचा केला शिरच्छेद तिरस्कार दावेदार । त्यास बोधे केला मार मन चोरटे धरिलें । नित्यनेमे जंजरिले आळस साक्षेपें घेतला। पायीं धरुनि आपटिला द्वेष बांधोनि पाडिला। खेद खाणोनि ताडिला गर्व ताठा विटंबिला। वाद विवेके झोडिला करुनि अभावाचा नाश । राहे रामीं रामदास