भजनी मालिका
← भजनांकडे परत

क्रिया कर्म धर्म तूंचि होसी माझे । राखेन मी तुझें द्वार देवा

kriya karma dharma tunchi hosi majhe | rakhen mi tujhen dvar deva

रचनाकार: संत नामदेव · अभंग
क्रिया कर्म धर्म तूंचि होसी माझे । राखेन मी तुझें द्वार देवा ॥१॥ मज पाळीसी तैसा पाळीं दीनानाथा । न सोडीं सर्वथा नाम तुझें ॥२॥ गाईन तुझें नाम ह्रदयीं धरुनि प्रेम । हाचि नित्य नेम सर्व माझा ॥३॥ नामा म्हणे केशवा सुखाच्या सागरा । तूं आम्हां सोईरा आदिअंतीं ॥४॥