भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोळशासी दूध मर्दोनियां धूतां । न पावे शुद्धता कांहीं केल्या

kolashasi dudh mardoniyan dhutan | na pave shuddhata kanhin kelya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कोळशासी दूध मर्दोनियां धूतां । न पावे शुद्धता कांहीं केल्या ॥१॥ दुर्जनासी तैसा बोध परमार्थ । नवजायचि स्वार्थ कांहीं केल्या ॥२॥ सूकराचे परी नेणती मिष्टान्न । विष्टा ते भक्षण करीतती ॥३॥ मोहियले प्राणी पाहतां पाहतां । काय सांगूं आतां नवलावो ॥४॥ नामा ह्मणे तया न होयचि मोक्ष । येवोनि पद्माक्ष केविं भेटे ॥५॥