भजनी मालिका
← भजनांकडे परत

क्षणक्षणां सांभाळितों । साक्षी होतों आपुला

kshanakshanan sambhaliton | sakshi hoton apula

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
क्षणक्षणां सांभाळितों । साक्षी होतों आपुला ॥१॥ न घडावी पायीं तुटी । मन मिठी घातली ॥ध्रु.॥ विचारतों वचनां आधीं । धरूनि शुद्धी ठेविली ॥२॥ तुका म्हणे मागें भ्यालों । तरीं जालों जागृत ॥३॥