भजनी मालिका
← भजनांकडे परत

क्षर अक्षर हे तुमचे विभाग । कासयानें जग दुरी धरा

kshar akshar he tumache vibhag | kasayanen jag duri dhara

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
क्षर अक्षर हे तुमचे विभाग । कासयानें जग दुरी धरा ॥१॥ तैसे आम्ही नेणों पालटोंचि कांहीं । त्यागिल्याची नाहीं मागें चाड ॥ध्रु.॥ प्रतिपादिता तूं समविषमाचा । प्रसाद तो याचा पापपुण्य ॥२॥ तुका म्हणे तुम्हां नाना अवगणीं । लागे संपादणी लटिक्याची ॥३॥