भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोणाचे हें रुप देह हा कोणाचा

konache hen rup deh ha konacha

कोणाचे हें रुप देह हा कोणाचा । आत्माराम साचा सर्व जाणे ॥१॥ मीतूं हा विचार विवेकें शोधावा । गोविंद हा ध्यावा याच देहीं ॥२॥ ध्येये ध्याता ध्यान त्रिपुटीं वेगळां । सहस्त्रदळीं उगवला सूर्य जैसा ॥३॥ ज्ञानदेव म्हणे नयनातींल रुप । या नांव चितपद तुम्ही जाणा ॥४॥