भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोणी एकी भुलली नारी । विकितां गोरस म्हणे घ्या हरी

koni eki bhulali nari | vikitan goras mhane ghya hari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कोणी एकी भुलली नारी । विकितां गोरस म्हणे घ्या हरी ॥१॥ देखिला डोळां बैसला मनीं । तो वदनीं उच्चारी ॥ध्रु.॥ आपुलियाचा विसर भोळा । गोविंद कळा कौतुकें ॥२॥ तुका म्हणे हांसे जन । नाहीं कान ते ठायीं ॥३॥