भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोणी एकाचिया पोरें केली आळी । ठावे नाही पोळी मागे देखी

koni ekachiya poren keli ali | thave nahi poli mage dekhi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कोणी एकाचिया पोरें केली आळी । ठावे नाही पोळी मागे देखी ॥१॥ बुझाविले हाती देऊनी खापर । छंद करकर वारियेली ॥ध्रु.॥ तैसे नको करू मज कृपावंता । काय नाही सत्ता तुझे हाती ॥२॥ तुका म्हणे मायबापाचे उचित । करावे स्वहित बाळकाचे ॥३॥