भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोणाशीं विचार करावा शेंवटीं । एवढया लाभें तुटी झाल्यातरे

konashin vichar karava shenvatin | evadhaya labhen tuti jhalyatare

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कोणाशीं विचार करावा शेंवटीं । एवढया लाभें तुटी झाल्यातरे ॥१॥ सांभाळितो शूर आला घावडाव । पुढें दिला पाव न करी मागें ॥ध्रु.॥ घात तो या नांवें येथें अंतराय । अंतरल्या पाय गोविंदाचे ॥२॥ तुका म्हणे गडसंदीचा हा ठाव । केला तो उपाय कार्या येतो ॥३॥