भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोणाचें घरदार मृगजळ संसार । तुझा तूं विचार करी बापा

konachen gharadar mrugajal sansar | tujha tun vichar kari bapa

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कोणाचें घरदार मृगजळ संसार । तुझा तूं विचार करी बापा ॥१॥ सोयरा तूं देव करी पां संसारीं । वायां हाव भरी होऊं नको ॥२॥ द्वैत अद्वैत टाकुनी परता । होई पां सरता देवापायीं ॥३॥ एका जनार्दनीं देवाविण तुज । राखील पां सहज कोण दुजा ॥४॥