भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

झालों स्वयें कृष्ण आठव हाचित्ती । भेद भयवृत्ति उरली आहे ॥१॥ उरली आहे रूप नांव दिसे भिन्न । मी आणि हा कृष्ण आठवतो ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

झुंजार ते एक विष्णुदास जगीं । पापपुण्य अंगीं नातळे त्यां ॥१॥ गोविंद आसनीं गोविंद शयनीं । गोविंद त्यां मनीं बैसलासे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

झेला रे झेला वरचेवरी झेला । हातिचें गमावी तो पाठीं साहे टोला ॥१॥ त्रिगुणाचा चेंडू हातें झुगारी निराळा । वरीलिया मुखें मन लावी तेथें डोळा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

टंवकारूनि दृष्टी लावुनियां रग । दावी झगमग डोळ्यांपुढें ॥१॥ म्हणती शिष्यासी लागली समाधी । लटकी चि उपाधी झकविती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

टाक रुका चाल रांडे कां गे केली गोवी । पुसोनियां आलें ठाव म्हणोनि देतें सिवी ॥१॥ आतां येणें छंदें नाचों विनोदें । नाहीं या गोविंदें माझें मजसी केलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

टाळघोळ सुख नामाचा गजर । घोषें जेजेकार ब्रह्मानंदु॥१॥ गरुडटके दिंडी पताकांचे भार । आनंद अपार ब्रह्मादिकां॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ठकिलें काळा मारिली दडी । दिली कुडी टाकोनियां ॥१॥ पांघुरलों बहु काळें । घोंगडें बळें सांडवलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ठेवूनि इमान राहिलों चरणीं । म्हणउनि धणी कृपा करी ॥१॥ आम्हांसी भांडार करणें जतन । आलें गेलें कोण उंच निंच ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

डगमगी मन निराशेच्या गुणें । हें तों नारायणें सांतवीजे ॥१॥ धीर तूं गंभीर जीवन जगाचें । जळो विभागाचें आआहाचते ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

डाई घालुनियां पोरें । त्यांचीं गुरें चुकवीलीं ॥१॥ खेळ खेळतां फोडिल्या डोया । आपण होय निराळा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम