तरलों म्हणऊनि धरिला ताठा । त्यासी चळ झाला फांटा
taralon mhanauni dharila tatha | tyasi chal jhala phanta
तरलों म्हणऊनि धरिला ताठा । त्यासी चळ झाला फांटा ॥१॥ वांयांविण तुटे दोड । मान सुख इच्छी मांड ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
taralon mhanauni dharila tatha | tyasi chal jhala phanta
तरलों म्हणऊनि धरिला ताठा । त्यासी चळ झाला फांटा ॥१॥ वांयांविण तुटे दोड । मान सुख इच्छी मांड ॥ध्रु.॥
tari kan nenate hote magen rushi | tinhin ya janasi duravilen
तरि कां नेणते होते मागें ॠषी । तींहीं या जनासी दुराविलें ॥१॥ वोळती जया अष्टमहा सिद्धी । ते या जनबुद्धी नातळती ॥२॥
tari kan pavade garjati puranen | asata narayan shiktahin
तरि कां पवाडे गर्जती पुराणें । असता नारायण शिक्तहीन ॥१॥ कीर्तीविण नाहीं नामाचा डांगोरा । येर कां इतरां वाणीत ना ॥ध्रु.॥
tari cha janma yaven | das viththalachen vhaven
तरि च जन्मा यावें । दास विठ्ठलाचें व्हावें ॥१॥ नाहीं तरि काय थोडीं । श्वानशूकरें बापुडीं ॥ध्रु.॥
tari cha shobhe vedi | nagna hoy dhad phadi
तरि च शोभे वेडी । नग्न होय धड फाडी ॥१॥ काय बोलाचें गौरव । आंत वरी दोन भाव ॥ध्रु.॥
tari cha ha jiv sansarin udas | dharila vishvas tumhan soi
तरि च हा जीव संसारीं उदास । धरिला विश्वास तुम्हां सोई ॥१॥ एके जातीविण नाहीं कळवळा । ओढली गोपाळा सूत्रदोरी ॥ध्रु.॥
tari myan alavave kona | kon he puravil vasana| tujavanchuni narayana | lavi stana krupavante
तरि म्यां आळवावे कोणा । कोण हे पुरवील वासना। तुजवांचूनि नारायणा । लावी स्तना कृपावंते ॥१॥ आपुला न विचारी सिण । न धरीं अंगसंगें भिन्न । अंगीकारिलें राखें दीन । देई जीवदान आवडीचें ॥ध्रु.॥
tarin amhi tujhi dhariyeli kas | nahin koni das vanyan gela
तरीं आम्ही तुझी धरियेली कास । नाहीं कोणी दास वांयां गेला ॥१॥ आगा पंढरीच्या उभ्या विटेवरी । येई लवकरी धांवें नेटे ॥ध्रु.॥
tari kan volangane | rajadvarin hoti sune
तरी कां वोळंगणे । राजद्वारीं होती सुने ॥१॥ अंगीं दावुनि निष्कामता । पोकळ पोकळी ते वृथा ॥ध्रु.॥
tarin cha myan deva | sati karuniyan jiva
तरीं च म्यां देवा । साटी करूनियां जीवा ॥१॥ येथें बैसलों धरणें । दृढ कायावाचामनें ॥ध्रु.॥
tarin bhalen vanyan gelon | janma alon maguta | mhanauni thelon das | savakas nirbhayen
तरीं भलें वांयां गेलों । जन्मा आलों मागुता । म्हणऊनि ठेलों दास । सावकास निर्भयें ॥१॥ उणें पुरें काय माझें । त्याचें ओझें तुम्हांसी ॥ध्रु.॥
tari sada nirbhar das | chintaasavirahit
तरी सदा निर्भर दास । चिंताआसविरहित ॥१॥ अवघाच एक ठाव । सर्व भाव विठ्ठलीं ॥ध्रु.॥
tari hanv keli amup vyaparen | vhaven ekasaren dhanavant
तरी हांव केली अमुप व्यापारें । व्हावें एकसरें धनवंत ॥१॥ जालों हरीदास शूरत्वाच्या नेमें । जालीं ठावीं वर्में पुढिलांची ॥ध्रु.॥
tarich hin kelin | danen vaint changalin
तरीच हीं केलीं । दानें वाईंट चांगलीं ॥१॥ एक एका शोभवावें । केलें कवतुक देवें ॥ध्रु.॥
taruvar bija potin | bij taruvara sevatin
तरुवर बीजा पोटीं । बीज तरुवरा सेवटीं ॥१॥ तैसें तुम्हां आम्हां जालें । एकीं एक सामावलें ॥ध्रु.॥
talamali chitta darshanachi asha | bahu jagadisha karuna keli
तळमळी चित्त दर्शनाची आशा । बहु जगदीशा करुणा केली ॥१॥ वचनीं च संत पावले स्वरूप । माझें नेदी पाप योगा येऊं ॥ध्रु.॥
tanv te mhane aika hrushikeshi vo | navajilen tumhi mhanan apanansi vo | tari kan vanchanuk sumanasi vo | nat natya baren sampadun janatosi vo
तंव ते म्हणे ऐका हृषीकेशी वो । नवाजिलें तुम्ही म्हणां आपणांसि वो । तरी कां वंचनुक सुमनासि वो । नट नाट्य बरें संपादूं जाणतोसि वो ॥१॥ सर हो परता परता हो आतां हरी । म्हणे सत्राजिताची कुमरी । जाणतें मी या शब्दाच्या कुसरी । ऐसें च करून ठकविलें आजिवरी वो ॥ध्रु.॥
tanv to hari mhane vo nijangane vo | lai nich kan desil dohane vo | majapen dujen alen ten dev jane vo | shabda kay he bolasi te une vo
तंव तो हरी म्हणे वो निजांगने वो । लाइ नीच कां देसील डोहणे वो । मजपें दुजें आलें तें देव जाणे वो । शब्द काय हे बोलसी ते उणे वो ॥१॥ पाहा मनीं विचारुनी आधि वो । सांडूनि देई भ्रांति करीं स्थिर बुद्धि वो । तंट केलें हें माझें तुझें उपाधीं वो । उघडी डोळे आझुनि तरी धरीं शुद्धि वो ॥ध्रु.॥
taken krupan to jevun kay ghali | ahach te chalivari kale
ताकें कृपण तो जेवूं काय घाली । आहाच ते चालीवरी कळे ॥१॥ काय तुम्हां वेचे घातलें सांकडें । माझे आलें कोडें आजिवरी ॥ध्रु.॥
tatadichi dhanv anga ani bhag | kholamba to mag nishchitancha
तातडीची धांव अंगा आणि भाग । खोळंबा तो मग निश्चितांचा ॥१॥ म्हणउनि वरी विचारावी चाली । उरीचि ते बोली कामा येते ॥ध्रु.॥