भजनी मालिका
← भजनांकडे परत

तरीं आम्ही तुझी धरियेली कास । नाहीं कोणी दास वांयां गेला

tarin amhi tujhi dhariyeli kas | nahin koni das vanyan gela

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तरीं आम्ही तुझी धरियेली कास । नाहीं कोणी दास वांयां गेला ॥१॥ आगा पंढरीच्या उभ्या विटेवरी । येई लवकरी धांवें नेटे ॥ध्रु.॥ पालवितों तुज उभरोनि बाहे । कृपावंता पाहे मजकडे ॥२॥ तुका म्हणे तुज बहु कान डोळे । कां हे माझे वेळे ऐसी परी ॥३॥