भजनी मालिका
← भजनांकडे परत

तरीच हीं केलीं । दानें वाईंट चांगलीं

tarich hin kelin | danen vaint changalin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तरीच हीं केलीं । दानें वाईंट चांगलीं ॥१॥ एक एका शोभवावें । केलें कवतुक देवें ॥ध्रु.॥ काय त्याची सत्ता । सूत्र आणीक चाळिता ॥२॥ तुका म्हणे धुरें । डोळे भरिले परि खरें ॥३॥