भजनी मालिका
← भजनांकडे परत

तरि कां नेणते होते मागें ॠषी । तींहीं या जनासी दुराविलें

tari kan nenate hote magen rushi | tinhin ya janasi duravilen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तरि कां नेणते होते मागें ॠषी । तींहीं या जनासी दुराविलें ॥१॥ वोळती जया अष्टमहा सिद्धी । ते या जनबुद्धी नातळती ॥२॥ कंदमूळें पाला धातूच्या पोषणा । खाती वास राणां तरी केला ॥३॥ लावुनियां नेत्र उगे चि बैसले । न बोलत ठेले मौन्यमुद्रे ॥४॥ तुका म्हणे ऐसें करीं माझ्या चित्ता । दुरावीं अनंता जन दुरी ॥५॥