भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

ज्वरल्यासी काढा औषध पाचन । मूढां नारायण स्मरवितो ॥१॥ भवव्याधि येणें तुटेल रोकडा । करूनियां झाड निश्चयेसी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

झड मारोनियां बैसलों पंगती । उठवितां फजिती दातयाची ॥१॥ काय तें उचित तुम्हां कां न कळे । कां हो झांका डोळे पांडुरंगा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

झाडे वरपोनि खाऊनियां पाला । आठवी विठ्ठला वेळोवेळां ॥१॥ वल्कलें नेसुनि ढुंगा गुंडाळुन । सांडी देहभान जवळुनी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

झाला कवतुक करितां रोकडें । आणीक ही पुढें नारायण ॥१॥ येउनियां पुढें धरिला मारग । हरावया भाग इंद्रापाशीं॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

झालिया दर्शन करीन मी सेवा । आणीक कांही देवा न लगे दुजें ॥१॥ प्रारब्धा अधीन अन्न अच्छादन । स्थिर करोनी मन ठेवी पायीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

झाली झडपणी खडतर देवता । संचरली आतां निघों नये ॥१॥ मज उपचार झणी उपचार झणी आतां करा । न साहे दुसरा भार कांहीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

झाली पाकसिद्धि वाट पाहे रखुमाई । उदक तापलें डेरां चीकसा मर्दुनी पाई ॥१॥ उठा पांडुरंगा उशीर झाला भोजनीं । उभ्या आंचवणा गोपी कळस घेउनी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

झाली हरीकथा रंग वोरसला । उचितासी आला पांडुरंग ॥१॥ वांटितो हें प्रेम उचिताचा दाता । घेई रे तूं आतां धणीवरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

झालें रामराज्य काय उणें आम्हांसी । धरणी धरी पीक गाई वोळल्या ह्मैसी ॥१॥ राम वेळोवेळां आम्ही गाऊं ओविये । दिळतां कांडितां जेवितां गे बाइये ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम