भजनी मालिका
← भजनांकडे परत

झाले आतां साठे । कासयाचें लहान मोठे

jhale atan sathe | kasayachen lahan mothe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
झाले आतां साठे । कासयाचें लहान मोठे ॥१॥ एक एका पडिलो हाती । झाली तेव्हांची निश्चितीं ॥ध्रु.॥ नाही फिरों येत मागे । झाले साक्षीचिया अंगे ॥२॥ तुका म्हणे देवा । आतां येथें नाही हेवा ॥३॥