भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्यावें हीनपणें । कासयाच्या प्रयोजनें

jyaven hinapanen | kasayachya prayojanen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ज्यावें हीनपणें । कासयाच्या प्रयोजनें ॥१॥ प्रारब्धीं संसार । बरी हिंमतीची थार ॥ध्रु.॥ होणार ते कांहीं । येथें अवकळा नाहीं ॥२॥ तुका म्हणे देवें । कृपा केलिया बरवें ॥३॥