जेणें माझें चित्त राहे तुझ्या पायीं । अखंड तें देई प्रेमसुख
jenen majhen chitta rahe tujhya payin | akhand ten dei premasukh
जेणें माझें चित्त राहे तुझ्या पायीं । अखंड तें देई प्रेमसुख ॥१॥ देहभाव राख दीन करूनियां । जनाचारी वायां जाय तैसा ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
jenen majhen chitta rahe tujhya payin | akhand ten dei premasukh
जेणें माझें चित्त राहे तुझ्या पायीं । अखंड तें देई प्रेमसुख ॥१॥ देहभाव राख दीन करूनियां । जनाचारी वायां जाय तैसा ॥ध्रु.॥
jenen majhen hit hoil to upav | karisil bhav janoniyan
जेणें माझें हित होईल तो उपाव । करिसील भाव जाणोनियां ॥१॥ मज नाहीं सुख दुःख तया खंती । भावना हे चित्तीं नाना छंदें ॥ध्रु.॥
jenen mukhen stavi | ten chi ninde pathin lavi
जेणें मुखें स्तवी । तें चि निंदे पाठीं लावी ॥१॥ ऐसी अधमाची याती । लोपी सोनें खाय माती ॥ध्रु.॥
jenen vadhe apakirti | sarvarthi ten varjaven
जेणें वाढे अपकीर्ती । सर्वार्थी तें वर्जावें ॥१॥ सत्य रुचे भलेपण । वचन तें जगासी ॥ध्रु.॥
jenen vel lage | aisen sandin pandurange
जेणें वेळ लागे । ऐसें सांडीं पांडुरंगे ॥१॥ कंठ कंठा मिळों देई । माझा वोरस तूं घेई ॥ध्रु.॥
jenen ha jiv dila dan | tayachen karin chintan | jagajivan narayan | gain gun tayache
जेणें हा जीव दिला दान । तयाचें करीन चिंतन । जगजीवन नारायण । गाईन गुण तयाचे ॥१॥ जो या उभा भीवरेच्या तिरीं । कट धरूनियां करीं । पाउलें सम चि साजिरीं । अंतरीं धरोनि राहेन ॥ध्रु.॥
jenen hoy hit | ten tun janasi uchit
जेणें होय हित । तें तूं जाणसी उचित ॥१॥ मज नको लावूं तैसें । वांयां जायें ऐसें पिसें ॥ध्रु.॥
jethen athavati svamiche te pay | uttam te thay ramya sthal
जेथें आठवती स्वामीचे ते पाय । उत्तम ते ठाय रम्य स्थळ ॥१॥ रान अथवा घर एकांत लोकांत । समाधान चित्त तें ते घडी ॥ध्रु.॥
jethen kirtan karaven | tethen anna na sevaven
जेथें कीर्तन करावें । तेथें अन्न न सेवावें ॥१॥ बुका लावूं नये भाळा । माळ घालूं नये गळां ॥ध्रु.॥
jethen jaton tethen tu majha sangati | chalavisi hatin dharuniyan
जेथें जातों तेथें तू माझा सांगाती । चालविसी हातीं धरूनियां ॥१॥ चालों वाटे आह्मी तुझा चि आधार । चालविसी भार सवें माझा ॥ध्रु.॥
jethen jaton tethen padato matola | na dekhije dolan labh kanhin
जेथें जातों तेथें पडतो मतोळा । न देखिजे डोळां लाभ कांहीं ॥१॥ कपाळीची रेखा असती उत्तम । तरि कां हा श्रम पावतों मी ॥ध्रु.॥
jethen javen tethen kapal sarisen | labh to visheshen santasangen
जेथें जावें तेथें कपाळ सरिसें । लाभ तो विशेषें संतसंगें ॥१॥ पूर्व पुण्यें जरि होतीं सानुकूळ । अंतरायमूळ नुपजे तेथें ॥ध्रु.॥
jethen jethen jasi | tethen maj chi tun pasi
जेथें जेथें जासी । तेथें मज चि तूं पासी ॥१॥ ऐसा पसरीन भाव । रिता नाहीं कोणी ठाव ॥ध्रु.॥
jethen dekhen tethen ubha | avaghya gaganacha gabha
जेथें देखें तेथें उभा । अवघ्या गगनाचा गाभा ॥१॥ डोळां बैसलें बैसलें । ध्यान राहोनि संचलें ॥ध्रु.॥
jethen dekhen tethen tujhi cha paulen | vishva avaghen kondatalen | rup gun nam avagha meghashyam | vegalen ten kay uralen | jatan lotanganin avaghi cha medini | sakal dev pat jalen | sada parvakal sudin suvel | chitta premen ase dhalen
जेथें देखें तेथें तुझी च पाउलें । विश्व अवघें कोंदाटलें । रूप गुण नाम अवघा मेघश्याम । वेगळें तें काय उरलें । जातां लोटांगणीं अवघी च मेदिनी । सकळ देव पाट जालें । सदा पर्वकाळ सुदिन सुवेळ । चित्त प्रेमें असे धालें ॥१॥ अवघा आम्हां तूं च जालासी देवा । संसार हेवा कामधंदा । न लगे जाणें कोठें कांहीं५७१
jethen pahen tethen kanditi bhus | chipaden chokhuni pahati ras
जेथें पाहें तेथें कांडिती भूस । चिपाडें चोखूनि पाहाती रस ॥१॥ काय सांगों देवा भुलले जीव । बहु यांची येतसे कींव ॥ध्रु.॥
jethen majhi drushti rahili baison | tethen chi hen man gundalaten
जेथें माझी दृष्टि राहिली बैसोन । तेथें चि हें मन गुंडाळतें ॥१॥ टाळावी ते पीडा आपणापासून । दिठाविलें अन्न ओकवितें ॥ध्रु.॥
jethen majhi drushti jay | tethen pay bhavin
जेथें माझी दृष्टी जाय । तेथें पाय भावीन ॥१॥ असेन या समाधानें । पूजा मनें करीन ॥ध्रु.॥
jethen lakshmicha vas | ganga ali papa nas
जेथें लक्ष्मीचा वास । गंगा आली पापा नास ॥१॥ तुझी पाऊली सुकुमार । तेथे मन माझे भ्रमर ॥ध्रु.॥
jethen vaishnavancha vas | dhanya bhumi punya desh
जेथें वैष्णवांचा वास । धन्य भूमी पुण्य देश ॥१॥ दोष नाहीं ओखदासी । दूत सांगे यमापाशीं ॥ध्रु.॥