भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेथें जातों तेथें तू माझा सांगाती । चालविसी हातीं धरूनियां

jethen jaton tethen tu majha sangati | chalavisi hatin dharuniyan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जेथें जातों तेथें तू माझा सांगाती । चालविसी हातीं धरूनियां ॥१॥ चालों वाटे आह्मी तुझा चि आधार । चालविसी भार सवें माझा ॥ध्रु.॥ बोलों जातां बरळ करिसी तें नीट । नेली लाज धीट केलों देवा ॥२॥ अवघें जन मज जाले लोकपाळ । सोइरे सकळ प्राणसखे ॥३॥ तुका म्हणे आतां खेळतों कौतुकें । जालें तुझें सुख अंतर्बाहीं ॥४॥