भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

जावें बाहेरी हा नाठवे विचार । नाहीं समाचार ठावा कांहीं ॥१॥ कांहीं न कळे तें कळों आलें देवा । मांडिला रिघावा कवतुक ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

जिकडे जाय तिकडे सवें । आतां यावे यावरी ॥१॥ माझ्या अवघ्या भांडवला । तू एकला जालासी ॥ध्रु.॥ आतां दुजे धरा झणी । पायां हुनी वेगळे ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

जिव्हा जाणे फिकें मधुर क्षार । येर मास पर हातास न वळे ॥१॥ देखावें नेत्रीं बोलावें मुखें । चित्ता सुखदुःखें कळों येती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जीयेवेळीं चोरूनियां नेलीं वत्सें । तयालागीं तैसें होणें लागे ॥१॥ लागे दोहीं ठायी करावें पाळण । जगाचा जीवन मायबाप ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

जीव खादला देवत । माझा येणें महाभूतें । झोंबलें निरुतें । कांहीं करितां न सुटे ॥१॥ आतां करूं काय । न चले करितां उपाय । तुम्हां आम्हां सये । विघडाविघड केली ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जीव जायवरी सांडी करी माता । हे तों आश्चर्यता बाळकाची ॥१॥ दुर्बळ कीं नाहीं आइकत कानीं । काय नारायणीं न्यून जालें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जीव जीती जीवना संगें । मत्स्या मरण त्या वियोगें॥१॥ जया चित्तीं जैसा भाव । तयां जविळ तैसा देव ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जीव तोचि देव भोजन ते भक्ती । मरण तेचि मुक्ति पाखांड्याची ॥१॥ पिंडाच्या पोषके नागविलें जन । लटिकें पुराण केलें वेद ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जीवनमुक्त ज्ञानी झाले जरी पावन । त्यजावा दुर्जन संगति ही ॥१॥ बहुत अन्न विष मोहरीच्या मानें । अवघें चि तेणें विष होय ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

जीवनावांचूनि तळमळी मासा । प्रकार हा तैसा होतो जीवा ॥१॥ न सापडे जालें भूमिगत धन । चरफडी मन तयापरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जीवभाव त्याचा गेला अभिमान । म्हणऊनि जन हांसे कंसा ॥१॥ सावध करितां नये देहावरी । देखोनियां दुरि पळे जन ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

जीवाचें जीवन अमृताची तनु । ब्रम्हांड भूषणु नारायण ॥१॥ सुखाचा सांगात अंतकासी अंत । निजांचा निवांत नारायण ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम