भजनी मालिका
← भजनांकडे परत

जीव जायवरी सांडी करी माता । हे तों आश्चर्यता बाळकाची

jiv jayavari sandi kari mata | he ton ashcharyata balakachi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जीव जायवरी सांडी करी माता । हे तों आश्चर्यता बाळकाची ॥१॥ दुर्बळ कीं नाहीं आइकत कानीं । काय नारायणीं न्यून जालें ॥ध्रु.॥ क्षणक्षणा माझा ने घावा सांभाळ । अभाग्याचा काळ ऐसा आला ॥२॥ तुका म्हणे नाहीं वचनासी रुचि । फल कटवें चि तें तें होय ॥३॥