भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाळें घातलें सागरीं । बिंदु न राहे भीतरी

jalen ghatalen sagarin | bindu na rahe bhitari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जाळें घातलें सागरीं । बिंदु न राहे भीतरी ॥१॥ तैसें पापियाचें मन । तया नावडे कीर्त्तन ॥ध्रु.॥ गाढव गंगेसी न्हाणिलें। जाउनि उकरड्यावरी लोळे ॥२॥ प्रीती पोसिलें काउळें । जाउनि विष्ठेवरी लोळे ॥३॥ तुका म्हणे तैसी हरी । कीरव्या नावडे कस्तुरी॥४॥