भजनी मालिका
← भजनांकडे परत

जावें बाहेरी हा नाठवे विचार । नाहीं समाचार ठावा कांहीं

javen baheri ha nathave vichar | nahin samachar thava kanhin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जावें बाहेरी हा नाठवे विचार । नाहीं समाचार ठावा कांहीं ॥१॥ कांहीं न कळे तें कळों आलें देवा । मांडिला रिघावा कवतुक ॥२॥ कवतुकासाठीं क्त देहावरी । आणिताहे हरी बोलावया ॥३॥ यासि नांव रूप नाहीं हा आकार । कळला साचार भक्ता मुखें ॥४॥ मुखें भक्तांचिया बोलतो आपण । अंगसंगें भिन्न नाहीं दोघां ॥५॥ दोघे वेगळाले लेखिल जो कोणी । तयाचा मेदिनी बहु भार ॥६॥ तयासी घडलीं सकळ ही पापें । भक्तांचिया कोपें निंदा द्वेषें ॥७॥ द्वेषियाचा संग न घडावा कोणा । विष जेंवी प्राणां नाश करी ॥८॥ करितां आइके निंदा या संतांची । तया होती ते चि अधःपात ॥९॥