भजनी मालिका
← भजनांकडे परत

जीव खादला देवत । माझा येणें महाभूतें । झोंबलें निरुतें । कांहीं करितां न सुटे

jiv khadala devat | majha yenen mahabhuten | jhombalen niruten | kanhin karitan na sute

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जीव खादला देवत । माझा येणें महाभूतें । झोंबलें निरुतें । कांहीं करितां न सुटे ॥१॥ आतां करूं काय । न चले करितां उपाय । तुम्हां आम्हां सये । विघडाविघड केली ॥ध्रु.॥ बोलतां दुश्चिती । मी वो पडियेलें भ्रांती । आठव हाचित्तीं । न ये म्हणतां मी माझें ॥२॥ भलतें चि चावळे । जना अवघिया वेगळे । नाठवती बाळें । आपपर सारिखें ॥३॥ नका बोलों सये । मज वचन न साहे । बैसाल त्या राहें । उग्या वाचा खुंटोनी ॥४॥ तुम्हां आम्हां भेटी । नाहीं जाली जीवेंसाठी । तुका म्हणे दृष्टी । पाहा जवळी आहे तों ॥५॥