भजनी मालिका
← भजनांकडे परत

जीवनावांचूनि तळमळी मासा । प्रकार हा तैसा होतो जीवा

jivanavanchuni talamali masa | prakar ha taisa hoto jiva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जीवनावांचूनि तळमळी मासा । प्रकार हा तैसा होतो जीवा ॥१॥ न सापडे जालें भूमिगत धन । चरफडी मन तयापरी ॥ध्रु.॥ मातेचा वियोग जालियां हो बाळा । तो कळवळा जाणा देवा ॥२॥ सांगावे ते किती तुम्हांसी प्रकार । सकळांचें सार पाय दावीं ॥३॥ ये चि चिंते माझा करपला भीतर । कां नेणों विसर पडिला माझा ॥४॥ तुका म्हणे तूं हें जाणसी सकळ । यावरी कृपाळ होई देवा ॥५॥