भजनी मालिका
← भजनांकडे परत

जीव तोचि देव भोजन ते भक्ती । मरण तेचि मुक्ति पाखांड्याची

jiv tochi dev bhojan te bhakti | maran techi mukti pakhandyachi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जीव तोचि देव भोजन ते भक्ती । मरण तेचि मुक्ति पाखांड्याची ॥१॥ पिंडाच्या पोषके नागविलें जन । लटिकें पुराण केलें वेद ॥ध्रु.॥ मना आला तैसा करिती विचार । म्हणती संसार नाहीं पुन्हा ॥२॥ तुका म्हणे पाठीं उडती यमदंड । पापपुण्य लंड न विचारीती ॥३॥