भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेथें कीर्तन करावें । तेथें अन्न न सेवावें

jethen kirtan karaven | tethen anna na sevaven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जेथें कीर्तन करावें । तेथें अन्न न सेवावें ॥१॥ बुका लावूं नये भाळा । माळ घालूं नये गळां ॥ध्रु.॥ तटावृषभासी दाणा । तृण मागों नये जाणा ॥२॥ तुका म्हणे द्रव्य घेती । देती ते ही नरका जाती ॥३॥