भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेथें देखें तेथें तुझी च पाउलें । विश्व अवघें कोंदाटलें । रूप गुण नाम अवघा मेघश्याम । वेगळें तें काय उरलें । जातां लोटांगणीं अवघी च मेदिनी । सकळ देव पाट जालें । सदा पर्वकाळ सुदिन सुवेळ । चित्त प्रेमें असे धालें

jethen dekhen tethen tujhi cha paulen | vishva avaghen kondatalen | rup gun nam avagha meghashyam | vegalen ten kay uralen | jatan lotanganin avaghi cha medini | sakal dev pat jalen | sada parvakal sudin suvel | chitta premen ase dhalen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जेथें देखें तेथें तुझी च पाउलें । विश्व अवघें कोंदाटलें । रूप गुण नाम अवघा मेघश्याम । वेगळें तें काय उरलें । जातां लोटांगणीं अवघी च मेदिनी । सकळ देव पाट जालें । सदा पर्वकाळ सुदिन सुवेळ । चित्त प्रेमें असे धालें ॥१॥ अवघा आम्हां तूं च जालासी देवा । संसार हेवा कामधंदा । न लगे जाणें कोठें कांहीं५७१ जेथें जावें तेथें कपाळ सरिसें । लाभ तो विशेषें संतसंगें ॥१॥ पूर्व पुण्यें जरि होतीं सानुकूळ । अंतरायमूळ नुपजे तेथें ॥ध्रु.॥ भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा । निकट वास बरा संतांपायीं ॥२॥ तुका म्हणे हे चि करावी मिरासी । बळी संतांपाशीं द्यावा जीव ॥३॥ च करणें । मुखीं नाम ध्यान सदा ॥ध्रु.॥ वाचा बोले ते तुझे चि गुणवाद। मंत्रजप कथा स्तुति । भोजन सारूं ठायीं फल तांबोल कांहीं । पूजा नैवेद्य तुज होती । चालतां प्रदक्षणा निद्रा लोटांगण । दंडवत तुजप्रति । देखोन दृष्टी परस्परें गोष्टी । अवघ्या तुझ्या मूर्ती ॥२॥ जाल्या तीर्थरूप वावी नदी कूप । अवघें गंगाजळ जालें । महाल मंदिरें माड्या तनघरें । झोपड्या अवघीं देव देवाइलें। ऐकें कानीं त्या हरीनाम ध्वनी । नाना शब्द होत जाले । तुका म्हणे या विठोबाचे दास । सदा प्रेमसुखें धाले रे ॥३॥