भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेथें पाहें तेथें कांडिती भूस । चिपाडें चोखूनि पाहाती रस

jethen pahen tethen kanditi bhus | chipaden chokhuni pahati ras

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जेथें पाहें तेथें कांडिती भूस । चिपाडें चोखूनि पाहाती रस ॥१॥ काय सांगों देवा भुलले जीव । बहु यांची येतसे कींव ॥ध्रु.॥ वैकुंठीचे मोटळें लटिकें चि फुगे । पेणिया जाऊनि भिक्षा मागे ॥२॥ तुका म्हणे कां उगे चि खोल । जवळी दाखवी आपणां बोल ॥३॥