भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेणें मुखें स्तवी । तें चि निंदे पाठीं लावी

jenen mukhen stavi | ten chi ninde pathin lavi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जेणें मुखें स्तवी । तें चि निंदे पाठीं लावी ॥१॥ ऐसी अधमाची याती । लोपी सोनें खाय माती ॥ध्रु.॥ गुदद्वारा वाटे । मिष्टान्नांचा नरक लोटे ॥२॥ विंचु लाभाविण । तुका म्हणे वाहे शीण ॥३॥